हिंगणघाट न.प. अमृत योजने अंतर्गत

हिंगणघाट न.प. अमृत योजने अंतर्गत

आज दि 12 डिसेंबर 2021 ला हिंगणघाट न.प. अमृत योजने अंतर्गत मल निस्सारण व हिंगणघाट शहर वाढीव पाणीपुरवठा योजना टप्पा क्र 1. व स्मशान भूमी सौंदरीकरण 154 कोटी कामाचे लोकार्पण समारंभ कार्यक्रमाचे उदघाटन मा.ना.नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या हस्ते पार पडले. सदर लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मी व प्रमुख्याने मा.खा.रामदासजी तडस, मा.आमदार समीरजी कुणावार सह नगरपरिषद अध्यक्ष प्रेमजी बसतानी,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिलजी गफाट, नगरपरिषद पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.