विधान परिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

विधान परिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

आज दि. ०७ मार्च २०२२ ला विधान परिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कडून बळजबरीने कापण्यात येत असल्याने त्यात पंढरपूर येथील सुरज जाधव या शेतकऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्त्या केल्याने असे बरेच महावितरणच्या चुकीच्या धोरणा मुळे आत्महत्या झाल्याने यावर चर्चा दरम्यान सभागृहात तहकूब करण्यात आले. त्या वेळी मा.विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर यांच्या नेतृत्वात विधान भवन परिसरात आघाडी शासन विरोधात पत्रकाराना संबोधित करताना मी व सन्मा. विधान परिषद सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.