विधानपरीषद सभागृहात ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा

विधानपरीषद सभागृहात ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा

आज दि. 04/03/2022 ला विधानपरीषद सभागृहात ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा न करता सभागृह स्थगित करून संपविण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने सुप्रिम कोर्टात आरक्षण माहीती डाटा व्यवस्थित न पुरविता व योग्य् बाजू न मांडल्याने कोर्टाने आरक्षण रद्द केले त्यामुळे सभागृहात ओबीसींना न्याय व आरक्षण मिळण्याकरीता परीपूर्ण चर्चा व्हावी अशी मागणी आमच्या वतीने करूनही कामकाज स्थगित करून संपविल्याने सभागृहातून घोषणा देत बाहेर पडून पत्रकार कक्षात मान. विरोधी पक्षनेते विधानपरिषद प्रवीणजी दरेकर यांच्या नेतृत्वात बाजु मांडण्यात आली, त्यावेळी मी व प्रामुख्याने सर्व विधानपरिषद सदस्य् उपस्थित होते.