विकास कामांचे भूमिपूजन
विकास कामांचे भूमिपूजन
विकास कामांचे भूमिपूजन
वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषद क्षेत्राचे आमदार म्हणून माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २५१५/१२३८ योजने अंतर्गत तसेच आमदार निधीतुन हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, हिवरा,धानोरा, शेकापुर (बाई), जामणी,वाघोली,बोरखेडी,या गावासह हिंगणघाट शहरातील विकास कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले.
वडनेर मध्ये मेहबूब सुब्बहानी दर्गाह(अगडशाह बाबा) येथील सिमेंट रस्ता, ग्रामपंचायत परीसराला आवार भिंतीचे बांधकाम, हिवरा येथे नदी घाटावर पायरी बांधकाम, सिमेंट रस्ता, धानोरा येथे सिमेंट रस्ता, शेकापुर बाई येथे समाज भवनाचे बांधकाम, जामणी येथे सिमेंट रस्ता,वाघोली येथे सिमेंट रस्ता, बोरखेडी येथे सिमेंट रस्ता, हिंगणघाट शहरात प्रभाग क्र. ११(अ), प्रभाग क्र. १४(अ), प्रभाग क्र.१५(अ), प्रभाग क्र.१९(ब) सिमेंट रस्तांचे बांधकामाचे भूमिपूजन केले.
या वेळी कार्यक्रमात सरपंच,शासकीय अधिकारी,भाजप पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्तिथ होते.








