वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग

वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग

आज दि. 28 नोव्हेंबर 2021 ला दत्तपूर वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आणि उपस्थित जनतेला मी संबोधित केले.
या कार्यक्रमाला भाजपा इतिहास व विकास विषयाचे वक्ते श्री.श्रीकांतजी देशपांडे, श्री अतुलजी तराळे अध्यक्ष तसेच सोशल मीडिया प्रभावी वापर या विषयाचे वक्ते श्री संजयजी फ़ांजे, अध्यक्ष श्री मिलिंदजी भेंडे आणि निवडणुकीचे व्यवस्थापन या विषयातील वक्ते अनिलजी सोले, अध्यक्ष श्री.सुरेशजी वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी मा.श्री.राजेशजी बकाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, मा.श्री.सुनीलजी गफाट भाजपा जिल्हाध्यक्ष, मा.श्री.अविनाशजी देव संघटन महामंत्री यांच्या सह नगर परिषद, नगर पालिका व भाजपाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.