रोजी शिवपार्वती सभागृह वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी बैठक

रोजी शिवपार्वती सभागृह वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी बैठक

दि 27 नोव्हेंबर 2021 रोजी शिवपार्वती सभागृह वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला मी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित.
येत्या निवडणुकीला बूथ निहाय रचना व तयारी,तसेच बूथ संघटन मजबूत करण्याविषयी मार्गदर्शन केले. याच वेळी काही कार्यकर्त्यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.
या वेळी भाजपाचे संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर, खासदार श्री रामदासजी तडस वर्धा, आम. श्री दादारावजी केचे आर्वी, आम. श्री पंकजजी भोयर, श्री राजेशजी बकाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, श्री सुनीलजी गफाट भाजपा जिल्हा अध्यक्ष, श्री अविनाशजी देव संघटन महामंत्री यांच्या सह जिल्हापरिषद पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.