नियोजन समिति ची आढावा बैठक

नियोजन समिति ची आढावा बैठक

14 जानेवारी 2022 ला जिल्हा परिषद सभागृह, वर्धा येथे जिल्हा वार्षिक नियोजन समिति ची आढावा बैठक वर्धा पालकमंत्री मा. नाम. श्री. सुनील जी केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समाज उपयोगी विकास कार्यं करण्याच्या हेतूने विविध मुद्दे मा. पालकमंत्री यांच्या समवेत मांडण्यात आले.
सदर बैठकीत माझ्यासह आर्वीचे आमदार श्री दादाराव जी केचे, वर्धेचे आमदार श्री पंकज जी भोयर, जि.प.अध्यक्षा सौ सरिताताई गाखरे, देवळीचे आमदार श्री रणजितजी कांबळे, मा. जिल्हाधिकारी, मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत सर्व अपेक्षित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.