कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कार्यालयासमोर धरणे आंदोलन

आज वर्धा येथील महात्मा गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आघाडी सरकार च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माझ्या बरोबर भारतीय जनता पक्षाचे खासदार श्री रामदास तडस, आर्वीचे आमदार श्री दादाराव केचे,, वर्धेचे आमदार श्री पंकज भोयर, भाजप प्रदेशचे श्री राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष श्री सुनील गफाट, जिल्हा महामंत्री श्री अविनाश देव व श्री मिलिंद भेंडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष श्री अतुल तराळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री मिलिंद जी देशपांडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री वरून पाठक, महिला मोर्चा अध्यक्ष सौ मंजुषा ताई दूधबडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.