सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या

आज दि.15 फेब्रुवारी 2022 ला माझ्या मतदार संघातील हिंगणघाट विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री समीर जी कुणावार यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी वर्धा येथे महात्मा गांधी चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. तसेच महावितरणच्या अनाठायी वसुली धोरणाच्या विरोधातील समस्या घेऊन थेट जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी चर्चाही केली. या साखळी उपोषणाच्या वेळी माझ्या समवेत वर्धा लोकसभा चे मा. खासदार श्री रामदास जी तडस, व भाजप जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गफाट यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.