आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

15 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत नालवाडी, वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला.
माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत खुल्या जागेच्या संरक्षण भिंतीचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले व ग्राम पंचायत नालवाडी तर्फे माझा व वर्धेचे आमदार डॉ. पंकज जी भोयर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी माझ्या बरोबर वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गफाट, जिल्हा परिषद सदस्या सौ नूतन ताई राऊत, सरपंच सौ प्रतिभा माऊसकर, श्री अविनाश देव श्री जयंत जी कावळे,श्री मिलिंद भेंडे,श्री गिरीश ची कांबळे, सौ सुनीता तडस, श्री दिनेश वराडकर, श्री सुनील पाटील, श्री सुनील काळे, यांच्यासमवेत नालवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.