आमदार स्थानिक विकास निधीतील भूमिपूजन, दिवाळी मिलन

आमदार स्थानिक विकास निधीतील भूमिपूजन, दिवाळी मिलन

दि 27 नोव्हेंबर 2021 ला सिंदी मेघे वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधीतील भूमिपूजन, दिवाळी मिलन आणि कोविड काळात उत्तम समाजसेवा करणाऱ्या नागरिकांचा नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थितअसून भूमिपूजन कार्यक्रमाचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
सिंदी मेघे ग्रामपंचायतीचे आणखी झपाट्याने विकास होण्याच्या दृष्टीने सदर ग्रामपंचायतीचे विलंगिकरण हे वर्धा नगर पालिकेत होणे गरजेचे आहे असे मी कार्यक्रमाला उपस्थित जनतेला संबोधित करीत असताना सांगितले. याच प्रमाणे कोरोनाच्या काळात गावोगावी घरोघरी जाऊन मूलभूत सुविधा पोहोचवून देणे, सर्व बाधित अबाधित रुगणांचा लेखाजोखा ठेवणे आणि कोविड लढाईतील केलेले उल्लेखनीय कार्य अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी केलेले असून त्यांचे आभार व्यक्त केले.
या वेळी आम.मा.पंकजजी भोयर वर्धा, श्री प्रदीपजी ठाकूर उपाध्यक्ष वर्धा नगरपालिका, श्री जयंतजी कावळे, सौ.सरस्वती ताई मडावी जिल्हा परिषद सभापती, श्री गुड्डूजी ठाकूर आयोजक, सुमितजी गाजरे, श्री राजूजी वाघमारे, श्री आशिषजी ठाकरे सह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.