ग्रीन जिमचे उदघाटन

ग्रीन जिमचे उदघाटन

आज वर्धा येथील सिंधी रेल्वे येथील प्रभाग क्रमांक 7 मध्ये माता मंदिर परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या ग्रीन जिमचे उदघाटन पार पडले.
शहरातील युवक-युवती तसेच महिलांच्या आरोग्याला हा ग्रीन जिम सहाय्यभूत ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रभागाच्या पालक आणि भाजपच्या गटनेत्या अजया साखळे, मुख्याधिकारी धनंजय सरनाईक, नगराध्यक्ष बबिता तुमाणे, श्री ओम राठी, सुमन पाटील, पुष्पा सिरसे, प्रकाश मेंढे, भाजपचे शहराध्यक्ष जयंत बडवाईक, मधुकर गुल्हाने, भाजपाचे महामंत्री अविनाश देव, प्रवीण सिर्सीकर, बंडू उंबरकर, सुधाकर घवघवे, यशवंत बडवाईक, स्नेहल कलोडे, पळसगांवचे सरपंच धीरज लेंडे, संग्राम कळणे, कैलास गवळी, रंन्ना पटेल व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनिल साखळे यांनी केले.