अटल टिकरिंग लॅब

अटल टिकरिंग लॅब

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील युवक भारती शिक्षण संस्था, पुलगाव तर्फे आयोजित ज्ञानभारती विद्यालय येथे *अटल टिकरिंग लॅब चा उदघाटन सोहळा पार पडला… या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपस्थित होतो… या कार्यक्रमाला माझ्या बरोबर संस्थेचे सचिव श्री नितिन जी रावेकर, उपाध्यक्ष सौ नेहताई रावेकर, जि. प. सदस्य श्री प्रवीण जी सावरकर, श्री संजय जी गाते, मुख्याध्यापिका सौ लताताई डोंगरे, श्री सतीश जी जगताप, श्री दुबे सर यांच्या समवेत शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते… आज संपूर्ण देशात 1700 शाळांमध्ये ही लॅब सुरू असून जवळपास 10,000 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. व 10 हजार शाळांमार्फत 1 कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकार चे आहे… सशक्त व समृद्ध भारत घडविण्याकरिता आपण विद्यार्थ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर घेऊन जावे…